अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- अहमदनगर शहरात महापालिकेने जम्बो कोविड सेंटर सुरू करावे, या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकार्यांनी मनपा दालनात ठिय्या आंदोलन केले.
मात्र या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात किरण गुलाबराव काळे (रा. भुतकरवाडी, नगर), मनोज गुंदेचा (रा. नवीपेठ, नगर), खलीलभाई चौधरी, अनीस चुडीवाला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपायुक्त डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मनपा दालनात बेकायदेशीर जमाव जमवून ठिय्या आंदोलन केले. घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या कोविड आदेशाचे उल्लंघन केले.
आंदोलनक र्त्यांनी गुरूवारी रात्री आयुक्त दालनातच मुक्काम ठोकला होता. व आंदोलन मागे घेत नसल्याने शुक्रवारी सकाळी आंदोलकांविरूद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.