अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापुस सुधार प्रकल्पात शुक्रवारी सकाळी 10 वा. खुरपणी व खत टाकण्याचे काम सोडून कोणाला विचारुन गेला असे विचारले असता ञयस्त व्यक्ती धिरज सर्जेराव पानसंबळ याने कापुस सुधार प्रकल्पाचे डाँ.नंदु काशिनाथ भुते यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापुस सुधार प्रकल्पाच्या शेतातील खुरपणी व खते टाकण्याचे काम चालू असताना या प्रकल्पावर काम करणारा मजुर शरद दादासाहेब शिरसाठ हा कामावरुन कोणाला न विचारता परस्पर राष्ट्रावादीचे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धिरज सर्जेराव पानसंबळ याच्या बरोबर निघून गेला होता.
धिरज पानसंबळ हा शरद शिरसाठ यास कापुस प्रकल्पावर सोडण्यासाठी आला असता शरद शिरसाठ यास कापुस प्रकल्पाचे डाँ.नंदु काशिनाथ भुते यांनी तु काम सोडून कोणाला विचारुन गेला होता. असे विचारीत असताना धिरज पानसंबळ याने त्याला कशाला बोलता मी त्याला घेवून गेलो होतो.
मी राष्ट्रावादी युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. तुला काय करायचे ते करा असे बोलून डाँ.भुते यांना बेदम मारहाण करण्यात आली.जीवे मारण्याची धमकी दिली. डाँ.भुते यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करु नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी व वाड्यावरुन प्रयत्न केले.पोलीसांवर हि दबाव तंञाचा वापर केला.
अखेर दुपारी 4;30 वा.राहुरी पोलीस ठाण्यात डाँ.भुते यांच्या फिर्यादी वरुन धिरज सर्जेराव पानसंबळ याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.