अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील शेणीत येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांविरोधात राजूर पोलीस ठाण्यात निधीचा नियमबाह्य खर्च केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेणीत ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सत्यभामा जाधव, तत्कालीन ग्रामसेविका अरुणा गंभिरे यांनी १ एप्रिल २०१८ ते २७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी,

१४ वा वित्त आयोग आणि पाणीपुरवठा या खात्यांमधील एकूण १ लाख ८० हजार २५८ रुपयांचा नियमबाह्य खर्च केला आहे. यात झालेल्या कामांचे मूल्यांकन व पूर्णत्वाचा दाखला न घेताच पूर्ण केलेले व्यवहार,

ग्रामपंचायत घरपट्टी व इतर कर जमा केलेले असताना ते ग्रामनिधी खात्यात वर्ग न करता खर्च करणे या व इतर व्यवहारात झालेल्या नियमबाह्य खर्चाबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गणपत धांडे यांनी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.