अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे. (Akshay Kardile Wedding)
सुरूवातील पोलिसांनी त्यांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस दिली होती. यानंतर देखील कर्डीले यांनी मुलगा अक्षय यांच्या विवाहसाठी गर्दी जमविल्याने पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे.
दरम्यान कर्डीले यांच्या मुलाच्या विवाहसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होवुन देखील पोलिसांनी फक्त 10 हजार रूपये दंड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलिसांनी फक्त दंडात्मक कारवाई केली. गुन्हा दाखल न केल्याने चर्चेला उधाण आले आहे.