अहमदनगर ब्रेकिंग : कार अपघातात दाेन शिक्षकांचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जाेराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दाेन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. नगर-पुणे महामार्गावरील चासजवळ शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

चंद्रशेखर लक्ष्मण ठाकूर (४२, रा. हडको, औरंगाबाद) व संजय भानुदास लेंडाळ (४५, रा. बोधेगाव, ता. शेवगाव) असे या मृत शिक्षकांची नावे आहेत. ठाकूर हे औरंगाबाद जिल्ह्यातील मठपाटी, तर लेंडाळ हे लाड सांगवी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.

लेंडाळ यांची मुलगी नवी मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिला सोडण्यासाठी हे दोघे शिक्षक मित्र नवी मुंबईला गेले होते. तेथून औरंगाबादकडे परत येत असताना नगर- पुणे महामागावरील चास घाटात रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

त्यांची कार पुढे चाललेल्या कंटेनरवर धडकली. अपघात इतका गंभीर होता की कारचा चक्काचूर झाला. चास परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केला. परंतु अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24