अहमदनगर ब्रेकिंग : दारूड्या बापाने केला मुलाचा खून!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-दारुड्या बापाने नशेत आपल्या पोटच्या मुलाचा डोक्यात लोखंडी गज घालून खून केल्याची खळबळजनक घटना आखेगाव (ता.शेवगाव) येथे मंगळवारी (दि.३०) पहाटे घडली.

पत्नी ताराबाई करपे हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध  पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे आखेगाव परिसर हादरला आहे. घटनेनंतर दारुड्या बाप पसार होण्यात यशस्वी झाला.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  आपला पती गोरख अनेक दिवसापासून दारूच्या आहारी गेल्याने घरात कायम किरकोळ स्वरूपाचे वाद होत होते,असे ताराबाई करपे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारी (दिं.२९ रोजी) तो दारू पिऊन घरी आला. सांयकाळी आपण शेतातून घरी आल्यानंतर आज होळीचा सण असुनही तुम्ही सणासुदीचे दारू का पिवून आलात ? असे विचारले. यावर रागावलेला पती आपल्याला मारण्याकरीता पुढे आला.

पंरतु, मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने आपला मार वाचला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ केली व तो घरातून निघून गेला.

त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवण करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आखेगाव शिवारातील गट नं.३२४ या त्यांच्या शेतातील ऊसाला पाणी देण्यासाठी गेले.

सोमनाथ हा ऊसाला पाणी देत होता. तर, त्याची आई ताराबाई ऊसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचल्याचे त्याला आवाज देऊन सांगत होती.

त्यांच्यात साधारण १०० फुटाचे अंतर होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथच्या ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे गेली,

त्यावेळी गोरख हा मुलास डोक्यावर लोखंडी गजाने मारत असल्याचे तिने पाहिले. वर्मी घाव लागल्याने सोमनाथ बांधावर कोसळला. अति रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24