अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील वरुडीपठार येथे एका वृद्धाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
सोमनाथ खेमा गांडाळ (७५) असे मृताचे नाव आहे. गुंजाळवाडी पठार येथील गांडाळ हे वरुडीपठार फाटा येथील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत दिसून आले.
परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही माहिती पोलीस पाटील शिवप्रसाद दिवेकर यांना दिली.