अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- वीज बील वसुली मोहिमेत शेतकर्यांची वीज तोडताना राहाता तालुक्यातील कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. ही घटना काल रांजणगाव परिसरात घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि रांजणगाव खुर्द येथील कंत्राटी कर्मचारी सुनील कोरडे यांचा डी. पी. बंद करीत असताना विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला.
यामुळे एकरूखे व रांजणगाव खुर्द येथील संतप्त शेतकर्यांनी दोन्ही गाव बंद करून राहाता येथील महावितरण कार्यालय समोर ठिया आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात एकरूखे व रांजणगाव खुर्द येथील संतप्त शेतकरी ग्रामस्थांनी मयत सुनील कोरडे याच्या पत्नी ला महावितरणमध्ये नोकरी द्यावी, तसेच सुनीलच्या कुटुंबाला मदत तातडीने करावी अशी मागणी केली आहे.