अहमदनगर ब्रेकिंग : ह्या कारणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील मोहन बंडू वाघ, वय ७० या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, सून व नातू असा परिवार आहे.

मागील आठवड्यात वाघ यांना एका राष्ट्रियकृत बँकेची कर्ज बसुलीबाबत नोटीस आली होती. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.त्यानंतर त्यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र यात त्यांची प्राणज्योत मालवली. मोहन बंडू वाघ (वय 75) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. मोहन वाघ हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या एका पायाची शस्त्रक्रियाही झालेली होती.

त्यांचा एक मुलगा पाच सहा वर्षापूर्वी मयत झाला होता तर दुसरा मुलगा सात ते आठ महिन्यांपूर्वी मरण पावला होता. मोहन वाघ यांना काही दिवसांपूर्वी एका बँकेकडून कर्ज भरा म्हणून वकिलामार्फत नोटीसही आली होती.

त्यांच्यावर किमान सात ते आठ लाख रुपये कर्ज होते. वसुलीसाठी त्यांना वारंवार बँकेतून फोनही येत होते.त्यामुळे त्यांनी विषारी पदार्थ सेवन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24