अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल खेळण्यावरून वडील रागावले; मुलाने जे केल ते वाचुन बसेल धक्का !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या जाळ्यात अडकून पडली आहे. मोठे तर मोठे लहानगण्याना देखील मोबाईलचे व्यसन लागले आहे.

व यामुळे ते चिडचिड प्रसंगी काहीही करतात. अशीच एक घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला लागून असलेल्या रांजणखोल गावामध्ये मोबाईल खेळणाऱ्या चौदा वर्षाच्या एका मुलाने त्याच्या वडिलांनी सारखा मोबाईल काय खेळतोस? असे बोलून खडसावले.

त्यामुळे वडिलांच्या बोलण्याने नाराज होऊन त्या मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मुलाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला तात्काळ श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालय येथे दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी सदर मुलगा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री.साळवी हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24