अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- अहमदनगर शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे.
19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण करणारा विजय पठारे पसार होता.
यापूर्वी त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आरोपी पठारे पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
अखेर उपनिरीक्षक मेढे व त्यांच्या पथकाने पठारे व त्याच्या एका साथीदाराला पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत.