अहमदनगर ब्रेकिंग : एलआयसीच्या कार्यालयात आग !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील भारतीय जीवन विम्याच्या (एलआयसी) कार्यालयास काल अचानक आग लागली.

यात कार्यालयातील संगणकासह इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. शहरातील लोकरूची नगरमध्ये डॉ. भारत सुंडाळे यांच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एलआयसी कार्यालयास काल मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचान्क आग लागली.

आग लागल्याचे इमारतीचे मालक डॉ. सुंडाळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब राहाता नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला फोन करून माहिती दिली.

त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले, व अग्निशमन पथकातील कर्मचाऱ्यांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला; परंतु या आगीत ऑफिसमधील कॉम्प्युटर, एसी, पैसे मोजण्याचे दोन मशीन,

फर्निचरसह इतर वस्तुंचे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार साधारण चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

गुढी पाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऑफिसला दोन दिवस सुट्टी असल्याने ऑफिसमध्ये कोणीही कर्मचारी नव्हते. ऑफिस बंद होते. ऑफिसच्या वरच्या मजल्यावर राहात असलेले

डॉ. सुंडाळे यांना ऑफिसच्या सायरनचा आवाज आला व खिडक्या आणि दारातून धूर येताना दिसला. त्यांनी लक्ष देऊन पाहिल्यावर आत काहीतरी जळत असल्याचा त्यांना वास आला.

लगेचच त्यांनी अग्निशामक दलाला बोलावले व ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनासुद्धा बोलावून घेतले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24