अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीच्या शेतीचे निर्वनीकरण करण्याचा रिपोर्ट तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी संगमनेरचे फॉरेस्ट अधिकारी विशाल बोर्हाडे याने संबंधित शेतकर्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
यात तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्विकारताना बोर्हाडे यास नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पडकडले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील एका शेतकर्याला त्यांची शेतीचे डी.फॉरेस्ट म्हणजे निर्वनिकरण आहे असा रिपोर्ट हवा होता. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता.
त्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कायदेशीर दृष्ट्या विशाल बोर्हाडे यास तक्रारदाराची जमीन निर्वनिकरण आहे असा रिपोर्ट पाठविण्यास सांगितला होता.
त्यानंतर तक्रारदार हा तेव्हा फॉरेष्ट अधिकारी बोर्हाडे याच्याकडे गेला, तेव्हा अधिकार्यांने त्याचे लाचखोर चाळे सुरू केले.
आज उद्या म्हणत तो त्याच्या मुळ मुद्यावर आला. दरम्यान, तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी स्थानिक अधिकार्यांना विनंती सोडून कोणतीही लालच दाखविली नाही त्यामुळे,
वारंवार येऊन देखील काम का होत नाही? असे म्हटले असता बोर्हाडे याने तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. जर ही रक्कम मिळाली नाही तर काम होणार नाही.मात्र, बोर्हाडे याने तक्रारदाराकडे सौदेबाजी सुरू केली.
हो नाही करता-करता अखेर 1 लाखांची रक्कम 40 हजार रुपयांवर येऊन पोहचली. वारंवार विनंती करुन देखील अखेर तक्रारदाराने अंतीम पाऊल उचलले, हा सर्व घडलेला प्रकार त्यांनी नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर यांना माहिती दिली.
त्यानंतर खेडकर यांचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. त्यानंतर इथे-तिथे करता करता ही 40 हजार रुपयांची रक्कम विशाल बोर्हाडे याने पुणे तालुक्यातील आळेफाटा येथे स्विकारली. तेथेच त्यास लाचलुचपतच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत