अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ शहराच्या माजी नगराध्यक्षांचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव बाबुराव पा. कदम यांचे निधन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव कदम हे आजारी होते.

त्यांच्या वर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार होता.

त्यांचा अंत्यविधी दुपारी १ वा. देवळाली प्रवरा येथील राहत्या घरी होणार आहे.त्यांच्या निधनाने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24