अहमदनगर ब्रेकिंग : भिषण अपघातात चार जण जागीच ठार , शहारे आणणारे दृष्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- नगर पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव शिवारात हा अपघात झाला असून सुपे पोलिस क्रेनच्या मदतीने वाहनांमध्ये, वाहनाखाली अडकलेले मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

ण्यावरून नगरकडे चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणाया ट्रकची कंटेनरला जोराची धडक बसली.

दरम्यानच्या काळात दोन्ही वाहनांच्या मधोमध चाललेल्या दुचाकीलाही ट्रकने ठोकर दिल्याने दुचाकी ट्रकखाली जाउन त्यावरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अचानक ब्रेक लावण्यात आल्याने ट्रकमधील पाईप बॉडी तोडून केबीनमध्ये शिरले.

त्यात ट्रकच्या चालकासह क्लिनरचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. ट्रकमध्ये आणखी किती व्यक्ती आहेत, याची अदयाप पोलिसांकडे माहीती नसून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहीनुसार ट्रकखाली तसेच ट्रकमधील रक्ताच्या थारोळयात पडलेल्या मृतदेेहांची अवस्था अंगावर शहारे आणणारी होती.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सुपे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेन बोलविण्यात आली असून अपघातहग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

चार मृत्यदेह पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, वाहने बाजूला केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. मृतांचे नावे आणि तपशील अद्याप हाती आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.