अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांडातील फरार आरोपीस उत्तर प्रदेशमधून अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील पसार चौथा आरोपी अक्षय कुलथे याच्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या.

येथील पत्रकार दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते

त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून

आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी( वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी) व तोफिक मुक्तार शेख (वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती

तसेच सदर गुन्हा पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय 46 , रा.वांबोरी) यास नगर औरंगाबाद जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त येथून अटक केली होती

परंतु अक्षय कुलथे हा फरार होता. Dyspसंदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता. बीनंदनकी जिल्हा फत्तेपूर उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक करून

आरोपीस ७२ तासांची Transit remand custody देण्यात आली आहे सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,

पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार वाघ, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे,

सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्रअरोळे, सुरेश औटी, फुरकान शेख शिवाजी खरात, रवींद्र मेढे, विकास गुंजाळ, सुनील शिंदे, नितीन शिरसाठ, आजिनाथ पाखरे आदींनी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24