अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्यामुळे दोन तरूणांनी राहुरी येथील १८ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला दिड महिना कोंडून ठेवले. दरम्यान तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केलाय.ही घटना १९ जून ते २४ जुलै रोजी दरम्यान राहुरी तालुक्यातील चेडगांव येथे घडली.
या घटने बाबत पिडीत १८ वर्षीय मुलीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १९ जून ते २४ जुलै रोजी दरम्यान या घटनेतील १८ वर्षीय मुलगी ही तिच्या घराजवळील ओढ्याणे तिचे आईकडे जात असताना चेडगाव ब्राह्मणी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरून यातील आरोपींनी त्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून मोटारसायकलवर बसवून तिचे अपहरण केले.
त्यानंतर तिला नगर तालूक्यातील केडगाव येथील रूमवर नेले. त्या मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न आरोपी बरोबर लावून दिले नाही. याचा राग मनात धरून आरोपींनी त्या मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दीड महिना त्या मुलीस रूममध्ये डांबून ठेवले. दरम्यान तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. आणि वेळोवेळी मारहाण केली.
सदर मुलीने दिनांक २९ जुलै रोजी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र शंकर बर्डे राहणार गोरेगाव, तालुका पारनेर, त्याच्या सोबत असलेला अनिल नावाचा तरूण आणि रवींद्र शंकर बर्डे याची ज्योती नामक चुलत बहीण राहणार केडगाव, ता. नगर. या तिघांवर अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आरोपी रवींद्र शंकर बर्डे याला ताबडतोब अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.