अहमदनगर ब्रेकिंग : वादळी पावसाने मोठे नुकसान ! घरांची पडझड, पत्रे उडाल्याने दहा कुटुंबे बेघर..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- pसोमवारी अचानक आलेल्या पावसाने आणि सुसाट वाऱ्याने कणगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहेत तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत.

या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने त्वरित मदत करावी, अशी मागणी सरपंच सर्जेराव घाडगे यांनी केली आहे.सोमवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील कणगर गावच्या परिसरात पावसाने व सुसाट वा‍ऱ्याने हजेरी लावली.

या अचानक आलेल्या वाऱ्यामुळे व पावसामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या सुसाट वाऱ्यामुळे क्षणात काही जणांचे घरावरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी जनावराच्या गोठ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडकळून पडले.अचानक आलेल्या पाऊस व वाऱ्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. यामध्ये सचिन चंद्रभान नालकर यांच्या घरावरील छप्पर उडून गेले व भेंड्याच्या भिंत देखील पडल्या तसेच गेनू एकनाथ घाडगे, मंगल किसन गाढे,

गणपत भिकाजी घाडगे, रमेश तुकाराम गाढे, अर्जुन विठोबा जाधव, भिमराज विठोबा जाधव, अशोक रामभाऊ जाधव, रघुनाथ पाटीलबा घाडगे, गोरक्षनाथ जयवंत वरघूडे यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.नुकसान झालेले बरीच घरे वडाचे लवण व घाडगे वस्ती परिसरातील आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24