अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ गावात खोदकाम करताना गुप्तधन सापडले!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात घराचे खोदकाम सुरु असताना खोदकाम करणारांना एक हंडा सापडला

त्यांनी तो मालकास सांगीतला त्यांनी तो माल ताब्यात घेतला असुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पुरातत्व विभाग ते गुप्तधन ताब्यात घेणार असल्याचे समजते.

याबाबत समजलेली माहीती अशी की , बेलापुर गावात जुनी व मोठी बाजारपेठ होती. त्या काळी धन हे सोन्याच्या स्वरुपात जमा करुन जमिनीत पुरुन ठेवले जात असत.

गावात असे अनेक जुने वाडे आहेत अशाच एका जागेचे खोदकाम काही मजुर करत होते त्यांना अचानक खोदताना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला त्यात बरेच सोने चांदी भरलेले होते तो हांडा घरमालकाने ताब्यात घेतला.

या बाबत खोदाकाम करणारांना काही अमिष दाखविण्यात आले होते परंतु ते पुर्ण न झाल्यामुळे गुप्तधनाचे बिंग फुटले अन या गुप्तधनाचा गावभर नव्हे जिल्हाभर बोभाटा झाला संबधीतांनी या ठिकाणी चांदी सापडली असल्याचा जिल्हाधिकारी यांना कळविले असुन

काही चांदी घेवुन संबधीत नगरला गेले आहेत परतु जिल्हाधिकारी हे पुरातत्व विभागाला आदेश करतील त्या नंतर महसुल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचा पंचनामा करुन ते धन महसुलच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगीतले आहे.

बेलापूरात गुप्तधन सापडल्याची चर्चा जिल्हाभर पसरली आहे त्यात फक्त चांदी असल्याचाच दावा करण्यात येत आहे ही घटना घडून तेरा चौदा दिवस झाले आहे.

मग इतक्या दिवस सर्वा जण गप्प का होते याची सखोल चौकशी झाल्यानंतर बरेच काही मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे या गुप्त धनाची चर्चा झाल्यानंतर पोलीसही सावध झाले असुन त्यांनीही चौकशी सुरु केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24