अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- शिर्डी येथील राजू आंतवन धीवर यांचा चार लाखांची सुपारी दिल्यानेच हा खून केल्याची धक्कादायक माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, की या खून प्रकरणाचा तांत्रिक पुराव्याच्या आधारे ४० सीसीटीव्ही फुटेजच्या अनुषंगाने या खुनाचा तपास सुरू करण्यात आला होता. या खुनाचा तपास नाशिक गुन्हे शाखेच्या माध्यमातूनदेखील करण्यात आला.
शिर्डी पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणात नाशिक पोलिसांची मदत घेऊन राजु ऊर्फ चंद्रहास सुभाष उबाळे, अविनाश प्रल्हाद सावंत (दोघेही पाथर्डी उपनगर, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांच्याकडे तपास केल्यावर मयत धीवर यांचा खून चार लाख रुपये सुपारी देऊन अमोल सालोमन लोंढे, अरविंद महादेव सोनवणे (दोघेही राहणार शिर्डी) यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचे सांगितले.
हा गुन्हा हसीम खान (नालासोपारा ठाणे), कुलदीप पंडित, साहिल शेख, साहिल पठाण ( तिघेही राहणार नाशिक) यांनी केल्याचे आरोपींनी सांगितले असून त्यांचा शोध सुरू आहे.
हा खून करण्यामागे आणखी काही कारण आहे का, या अनुषंगानेदेखील शिर्डी पोलिस प्रयत्न करत आहेत. लवकरच सर्व गोष्टींचा उलगडा होईल, असे त्यांनी सांगितले.