अहमदनगर ब्रेकिंग : शिवाजी कर्डीले यांच्या मध्यस्थीने तनपुरे कारखाना कामगारांचे उपोषण मिटले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांनी गेल्या १४ दिवसापासून उपोषण सुरू केले होते.सत्ताधारी संचालक मंडळाने दोन पाऊले पुढे तर कामगारांनी दोन पाउले मागे घेऊन १४ व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आले.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनित धसाळ यांनी समनव्याची भूमिका बजावून कामगार व संचालक मंडळात तडजोड घडवून आणुन कामगारांना उपोषण मागे घेण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. 

गेल्या २३ ऑगस्ट पासून डॉ.तनपुरे कारखाना कामगारांनी २५ कोटी ३६ लाख रुपये देणी घेण्यासाठी उपोषण सुरू केले होते. या उपोषणात इंद्रभान पेरणे, सचिन काळे, बाळासाहेब तारडे, सीताराम नालकर, नामदेव शिंदे, राजेंद्र सांगळे, सुरेश तनपुरे आदी ७ कामगार सहभागी झाले होते. 

रविवार दि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5  वाजता माजीमंत्री शिवजीराव कर्डीले, चेअरमन नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, संचालक महेश पाटील, शामराव निमसे, सुरसींग पवार, रविंद्र म्हसे, बाळकृष्ण म्हसे, ऊत्तम आढाव, अर्जुन बाचकर, के.मा.कोळसे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, ज्ञानेश्वर विखे, सुबोध विखे, मनोज गव्हाणे, पत्रकार विनीत धसाळ आदि उपस्थित होते.

यावेळी माजीमंत्री ना.राधाकृष्ण विखे व खा.सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची विळद घाट येथे बैठक होऊन कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. त्या नुसार विखे यांनी माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांना सर्वाधिकार देऊन उपोषण सोडण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले.

माजीमंत्री कर्डीले व भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनीत धसाळ यांनी कामगारांशी सकारात्मक चर्चा करून वाटाघाटी केल्या. कामगारांच्या मागण्या पूर्णतः मान्य करून महिन्यातल्या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या.

तर भविष्य  निर्वाह निधी दरमहा १ कोटी याप्रमाणे ६ महिन्याला ६ कोटी रुपये भरण्याचे मान्य केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदान व वेतनवाढ संचालक मंडळ  व युनियनशी यांच्याशी  चर्चा करून देण्यात येईल. कामगार वसाहतीतील वीजपुरवठा आठ दिवसात सुरळीत करण्यात येईल.

प्रत्येक पगाराची स्लिप संचालक मंडळाने मान्य केले.डिसेंबर २०२० नंतरचे थकीत पगार नियमित पगाराबरोबर देण्यात येतील आदी लेखी मागण्याचा प्रस्ताव कामगारांपुढे ठेवण्यात आला होता. त्यावर चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या सह्या करण्यात आल्या होत्या.