अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर पती-पत्नीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) असे या मृत पतीपत्नीचे नाव आहे.
शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी आहेत. सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे पति-पत्नी आज का लवकर उठले नाही म्हणून शेजारच्यांनी घरी जाऊंन पहिले तर सदर प्रकार लक्षात आला.
दोघेही रक्ताने भरलेले आणि त्यांच्या डोक्याजवळ पावडे रक्तानी भरलेले पहिल्यानंतर स्थानिकानी राहाता पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.
राहाता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे आणि पोलीस उप विभागीय अधिकारी संजय सातवसह मोठा पोलीस फ़ौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
या पती-पत्नीवर पावड्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहीती समोर येत असुन यांच्या हत्याच्या मागचे कारण आद्यपही अस्पष्ट आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.