अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजकांच्या कार्यालयावर आयकर खात्याचे छापे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- संगमनेर शहरातील दोघा उद्योजकांच्या कार्यालयावर आयकर खात्याच्या पथकाने काल बुधवारी अचानक छापे टाकले. या उद्योजकांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी बराच वेळ सुरु होती.

आयकर खात्याच्या या कारवाईमुळे संबंधीतांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक व पुणे येथील आयकर खात्याच्या पथकाने सकाळीच शहरातील नाशिक रोडवरील एका उद्योजकाच्या कार्यालयावर छापा टाकला.

यानंतर या पथकाने नविन नगररोडवरील एका कार्यालयावर छापा टाकला. आयकर खात्याची तीन वाहने या कार्यालयाबाहेर लावण्यात आली होती.

पथकातील कर्मचारी उद्योजकाच्या कार्यालयात पोहचताच त्यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले. यानंतर हे कर्मचारी आतमध्ये गेले.

बराचवेळ त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीत आयकर खात्याच्या अधिका‍र्यांना काय आढळून आले. याबाबतची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. गतवर्षीही आयकर खात्याने संगमनेरात अशी कारवाई केली होती.

अहमदनगर लाईव्ह 24