अहमदनगर ब्रेकिंग : इंदुरीकर महाराज थेट एसपी कार्यालयात; ‘यांच्या’ विरूध्द केली तक्रार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. माझ्या संमतीविना किर्तनाच्या सीडी प्रसारित होत असून,

या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे.

पोलीस अधीक्षक पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या किर्तनाच्या सीडी बनवण्याबाबत एका कंपनीला अधिकार दिले आहेत.

परंतु संबंधित कंपनी त्या अधिकाराचा गैरवापर करीत आहे, अशी महाराजांची तक्रार आहे. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

महाराजांनी याबाबत माध्यमांशी बोलण्याचे टाळले असले तरी याप्रकाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. इंदुरीकर महाराज हे शुक्रवारी अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात आले.

याबाबत त्यांनी अतिशय गुप्तता पाळली. कोणालाही याची भनक लागणार नाही, यासाठी त्यांच्याकडून काळजी घेतली जात होती. मात्र, माध्यमांनी इंदुरीकर यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात गाठले.

यावेळी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचे कारण विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मिळालेल्या माहितीनुसार इंदुरीकर महाराज यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी एका कंपनीच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही केली आहे.