अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेल मध्ये सुरु होता ‘तो’ उद्योग तीन परप्रांतीय मुलींची सुटका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-  अहमदनगर मधील हॉटेल राजयोगमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून तीन परप्रांतीय मुलींची सुटका करुन दोनजणांना अटक करण्यात आली आहे. ही धडकेबाज कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील खंडाळ गावाच्या शिवारात नगर ते दौड जाणारे रोडच्या बाजूला असणारे हॉटेल राजयोगमध्ये मालक अनिल माणीकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25. दोघे रा – खंडाळा ता.जि.अ.नगर)

हे दोघे संगनमताने आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये परप्रांतीय मुलीना देहविक्री करण्यासाठी बोलावून घेऊन त्याचे मार्फतीने गैरमार्गाने देहविक्री करुन कुंठणखाना चालवीत आहे, अशी माहिती मिळाली होती, या माहितीनुसार श्री पाटील यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या पोलीस पथकाने छापा टाकला.

या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना स्नेहालय येथे पाठवले आहे. दरम्यान, हाॅटेल मालक व मुलगा याना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. 500 रु.दराच्या 14 नोटा व 100 रु.दराच्या 15 नोटा असे एकुण 8 हजार 500 रुपयांचे जप्त करण्यात आले आहे.

हाॅटेल मालक व मुलगा यांना अटक करून नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोउपनि दिलीप बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. 385/2021 स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24