अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कसेवक पदाचा गैरवापर करून 5 कोटी 94 लाख 96 हजार 72 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध राज्याच्या लोकायुक्तांकडे सोमवारी (दि. 30) तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आमदार लंके यांचे समर्थक अँड.राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके, सुहास साळके यांनी प्रसिध्द विधीतज्ज्ञ अँड. असीम सरोदे यांच्या मार्फत मुंबईतील लोकायुक्तांकडे एक तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत तहसीलदार देवरे यांनी पाच कोटी 94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले आहे. या याचिके संदर्भात अँड.असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
यात ते म्हणाले, पदाचा गैरवापर करणे, पदाचा वापर करून स्वतःसाठी झटपट पैसे कमविण्याचे साधन म्हणून ते वापरणे, लोकांवर दबाव टाकून मुद्दाम त्रास देण्यासाठी त्यांची वाहने बेकायदेशीर रित्या पकडणे, वाळू उत्खनन करणारे यंत्र बेकायदेशीरपणे सोडून देण्यासाठी पैसे घेण्याचा जो प्रकार आहे,
त्यामुळे 5 कोटी 94 लाख रूपये एवढा मोठा घोटाळा समोर येत आहे. देवरे यांनी धुळे शहरात तहसीलदार असताना हजार कोटीच्या जमिनींचा गैरव्यवहार केला आहे.
तिथल्या चौकशीतही निष्पन्न झाले आहे की, त्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारा विरोधात मुंबईतील लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.
त्याची लवकरात लवकर सुनावणी होईल, असे अँड.सरोदे यांनी सांगितले. दरम्यान ज्योती देवरे यांनी अहवालावर स्पष्टीकरण देताना म्हणाल्या की, वाळू लिलाव संदर्भात रेव्हेन्यू लॉस झाल्याचं म्हटलं आहे
तर तो 100 ब्रासचा वाळू लिलाव होता. ज्यावेळी बोली लावली जात होती, तेव्हा प्रांताधिकारी यांचा फोन आला होता की, शासकीय कंत्राटदारांसाठी तो वाळू लिलाव तसाच ठेवा, त्यामुळे बोली लावू दिली नाही.
संबंधित कॉन्ट्रॅक्टने तो घेतला. मात्र त्याचे पैसे भरले नाहीत त्यामुळे त्याला लिलाव दिला पण नाही आणि पुढे कारवाई पण झाली नाही. म्हणून रेव्हेन्यू लॉस झालं नसल्याचं ज्योती देवरे यांनी सांगितलं.