अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार हत्याप्रकरणी ‘लाल्या’ ताब्यात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातिर अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी लाल्या उर्फ अजून माळी यास पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघे फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

दि.६ एप्रिल रोजी भरदुपारी पत्रकार रोहिदास राधूजी दातीर यांचे अपहरण झाल्यानंतर दिवसभर त्यांचा काही शोध लागला नव्हता.

रात्री नऊ ते दहा वाजे दरम्यान त्यांचा मृतदेह राहुरी शहरातील काॅलेज रोडला असलेल्या रोटरी ब्लड बॅक जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लाॅटमध्ये आढळून आला.

रोहिदास दातीर यांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात लोकांनी दातीर यांना बेदम मारहाण करून त्यांचा निर्घृणपणे खून केला.

दरम्यान दातीर हत्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांची चौकशी करून त्यांना सोडून दिले.

त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू ठेवून लाल्या उर्फ अर्जुन माळी याला पकडले असून याप्रकरणातील अन्य आरोपी कान्हू मोरे,अक्षय मोरे, लाल तौफिक शेख फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

उरलेले तीन आरोपी पकडल्यानंतर हत्या कशासाठी करण्यात आली याचा उलगडा होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24