अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर छापा टाकून ६ लाख रुपयांचा माल जप्त करण्याची मोठी कारवाई कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने करून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये प्रती बॅग 40 किलो, एकूण बॅग संख्या 150 असा 6 लाख-रुपयाचा बनावट वटाणा बियाणे हस्तगत केले आहे.
पारनेर ठाण्यामध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेबाबत किरण गुलाबराव गवय यांनी फिर्याद दिली आहे. बनावट बियाणे संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
कृषी विभागाच्या पथकाला बोगस वटाणे बियाणे विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे कृषी विभागाने पारनेरमध्ये सापळा रचून ही कारवाई केली. बोगस बियाणाचा ट्रक (क्र.युपी 92 टी 8149) हा आंबेडकरचौक पारनेर येथे उभा होता.
त्यात एकूण 6 टन वजनाचे बनावट वटाणा बियाणे आहे. ट्रकमध्ये एकुण 6 लाख रुपयाचा बनावट वटाणा बियाणे मिळून आला आहे. ट्रकवरील चालक तसेच पटेल सिडस कार्पोरेशन जालीन युपी या कंपनीचा मालक यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.