अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- नगर शहरातील बहुचर्चित शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणात योगेश मालपाणी याला आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली आहे.
शहर सहकारी बँकेने 17 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस कर्ज वाटप केल्याने डॉ. शेळके व बँकेचे संचालक मंडळ यांच्यासह 25 जणांविरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
या मशिनरींचा पुरवठा योगेश मालपाणी याच्यामार्फत झाला होता, हे तपासात पुढे आले आहे. यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.
मालपाणी यास आज न्यायालयासमोर हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली.
राहुरी येथील डॉक्टर भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉक्टर उज्वला कवडे आणि विनोद श्रीखंडे या तीन डॉक्टरांची फसवणूक करत त्यांच्या नावे शहर बँकेतून कर्ज उचलले.
या तिन्ही डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर निलेश शेळके याने प्रस्तावित एम्स हॉस्पिटल उभारणीसाठी फिर्यादी डॉक्टरांना भागीदार करून घेतले.
त्यांचे नावे परस्पर कर्ज उचलले. या प्रस्तावित हॉस्पिटलसाठी मशिनरी पुरविण्याचा ठेका योगेश मालपाणी यास देण्यात आला होता. याच प्रकरणात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज मालपणी यास अटक केली.