अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव आणि परिसरातील गावांमध्ये आज दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
काही तासांच्या अंतराने हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील बोटा व घारगाव परिसरात गुरुवारी (25 मार्च) दुपारी 3.36 ते 4.37 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.
दरम्यान, याप्रकरणी नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर याची नोंद झाल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान अनेक वर्षांपासून बोटा गावासह आजूबाजूच्या गावांना भूकंपाचे धक्के बसले आहे.
त्या धक्क्यांची नोंदीही नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंपमापक यंत्रावर झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा दुपारी धक्के बसले.