अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- गळ्यातील सोन्याचे दागिने लुबाडण्यासाठी वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड घालून ठार मारून तिच्या कानातील कर्णफुले व डोरले बोचकाडून आरोपी सुनील पदमेरे पसार झाला. ही घटना पेंडशेत येथे घडली.
या दुर्घटनेत शांताबाई गोविंद पदमेरे ही वृद्धा जागीच ठार झाली. घटनेनंतर घटनास्थळावरून फरार आरोपी सुनील यास राजूर पोलिसांनी टाकेद, तालुका इगतपुरी येथून शिताफीने अटक केली. घटनेच्या दिवशी सुनीलने तेथून पळ काढला.
तो टाकेद येथे बांबळेवाडीत जाऊ शकतो, असा अंदाज घेऊन पोलिसांनी तो तेथे पोहोचण्यापूर्वीच धडक मारली. अवघ्या दोन तासांत राजूर पोलिसांनी आरोपी सुनीलला टाकेद येथून ताब्यात घेतले.
सुनीलने दारूच्या आहारी जाऊन हा गुन्हा केल्याचे उघड झाले. राजूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक होत आहे. या कारवाईत राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,
पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देविदास भडकवाड, प्रवीण थोरात, दिलीप डगळे, कैलास नेहे, अकोले पोलिस ठाण्यातील आनंद मैड, गणेश शिंदे, राकेश मुळाणे, विजय मुंढे, विजय फटांगरे, होमगार्ड सोमनाथ उगले यांंचा सहभाग होता.