अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलमध्ये वेटरचा खून,एकच खळबळ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गा लगत असलेल्या हाॅटेल साक्षी येथे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा सोनू छत्री या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली.

सोनू छत्री याच्या डोक्यात लोखंडी टामी मारून डोक्याचा चेंदामेंदा करत निर्घृण खूण केल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुरी पोलिस ठाणे हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर शरद म्हसे व पप्पू म्हसे यांच्या मालकीचे साक्षी नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलमध्ये एकूण चार तरूण वेटर म्हणून कामाला होते.

त्यापैकी मयत सोनू नारायण छत्री व नामदेव दराडे हे दोन वेटर रात्री हाॅटेलमध्येच झोपत असत. दिनांक १८ सप्टेंबर रोजी रात्री नेहमी प्रमाणे हाॅटेल बंद झाल्यावर हाॅटेल मालक व इतर वेटर घरी निघून गेले. तर मयत सोनू छत्री व नामदेव दराडे हे दोघे हाॅटेलमध्येच झोपले.

दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी सोनू छत्री याचा मृतदेह हाॅटेलमध्ये दिसून आला. सोनू याच्या डोक्यात लोखंडी टामी मारून त्याचा निर्घृण खूण केल्याचे दिसत होते. तर दुसरा वेटर नामदेव दराडे हा पसार झाला आहे. ही घटना मध्यरात्री पाऊने दोन वाजे दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधिक्षक डाॅ. दिपाली काळे, संदिप मिटके, राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे, निरज बोकिल, तुषार धाकराव यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ञ सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मदने व त्याचे पथक आणि रक्षक नामक श्वानासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रक्षक नामक श्वान हे जागेवरच घुटमळले. पोलिस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवीला.

मयत सोनू छत्री हा नेपाळ येथील रहिवाशी असून तो काही वर्षांपासून हाॅटेल साक्षी येथे वेटर म्हणून काम करत होता. पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. तसेच पसार झालेला वेटर नामदेव दराडे हा काही दिवसांपूर्वीच हाॅटेल साक्षी येथे कामाला आला होता.

घटनेनंतर तो पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. मयत सोनू छत्री याचा खूण नेमका कोणी व कोणत्या कारणाने केला. हे अद्याप समजू शकले नाही. या घटने बाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.