अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अकोले तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे रविवार दिनांक ६ जून रोजी सायंकाळी सात वाजता वाळू भगवंता बांडे (वय ३५) या तरुणाचा पाईपाने डोक्यात मारून खून करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले, की भगवंता शंकर बांडे (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजुर पोलिसांनी आरोपी भिमा चिंतामण बांडे, हरिचंद्र बाजीराव बांडे, स्वप्नील भीमा बांडे (सर्व रा. खडकी, ता. अकोले) यांच्या विरुद्ध गु.र.नं. ८६/२०२१ नुसार, भा.दं.वि. कलम ३०२, ३२४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवार दि. ६ जुन रोजी सायंकाळी सात वाजता खडकी येथे आरोपींनी संगमनताने हातात लोखंडी पाईप व काठ्या घेऊन भगवंता बांडे यांच्या घरासमोर येऊन त्यांना व त्यांच्या तीन मुलांना मारहाण केली.
यात काळू बांडे जखमी झाले, तर वाळु बांडे याच्या डोक्यात लोखंडी पाईपाने मारहाण केल्याने जागीच ठार झाला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, कैलास नेहे, भडकवाड आदी करत आहेत.