अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,आमदार डॉ. लहामटे १६ मे रोजी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यांना संगमनेर येथील चैतन्य हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
डॉ. नितीन जठार यांच्याकडूनही उपचाराची माहिती घेतली. आमदार डॉ. लहामटे यांची तब्येत स्थिर असली तरीही अद्याप ताप कायम असल्याचे नमूद करण्यात आले. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे
यांनी आमदार डॉ. लहामटेंवर पुढील उपचार मुंबईतील ब्रीचकॅन्डी रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी दुपारनंतर डॉक्टर लहामटे यांना पुढील उपचारार्थ संगमनेर येथील चैतन्य रुग्णालयातून मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आले.
. ते राजूर येथील आपल्या निवासस्थानी विलगिकरण कक्षात राहून उपचार घेत होते. त्यांनी ३ दिवस घरीच स्वत:ला विलगिकरण करून घेतले. पण त्यांचा ताप काही कमी होत नसल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांना संगमनेर येथील डॉ. नितीन जठार यांच्या चैतन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.