अहमदनगर ब्रेकिंग : नर्सला लग्नाचे आमिष दाखवून अकरा महिने बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर येथील एका मोठ्या रुग्णालयात एक २६ वर्षीय तरूणी स्टाफ नर्स म्हणून खाजगी नोकरी करत आहे. फय्याज शेख याने त्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग अकरा महिने वारंवार बलात्कार केल्याची घटना राहुरी व नगर पोलिस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात घडली आहे.

संगमनेर तालूक्यात राहत असलेली एक २६ वर्षीय तरूणी अहमदनगर येथील एका मोठ्या रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून खाजगी नोकरी करत आहे.

सध्या ती तरूणी अहमदनगर येथे त्या रुग्णालया समोरच रहावयास आहे. तिने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, १३ जून २०२० ते ७ मे २०२१ या दरम्यान आरोपी फय्याज असलम शेख राहणार देवळाली प्रवरा, तालूका राहुरी.

याने फिर्यादी २६ वर्षीय तरूणीला राहुरी तालूक्यातील चिंचोली फाटा तसेच अहमदनगर येथील माळीवाडा परिसरातील यशोधन लॉज येथे घेऊन गेला. तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केलाय.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संगमनेर तालूक्यातील त्या तरूणीची राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याच्या बरोबर ओळख झाली होती. ओळखीमधून घनिष्ठ संबंध निर्माण झाले नंतर भेटीगाठी सुरू झाल्या.

याच दरम्यान फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सुमारे एक वर्ष वारंवार बलात्कार केला. अशी माहीती मिळाली आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसां समक्ष कथन केला. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत फय्याज असलम शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24