अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात बुडून एकाचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक वृद्ध व्यक्ती पडले.

कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाच किमी अंतरावर आखाडा येथे रात्री साडेआठ वाजता मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव आहे. त्यांची वस्ती कालव्याच्या कडेला आहे. त्यांना दृष्टीदोष होता.

दुपारी घरातून बाहेर पडल्यावर ते नाहीसे झाले होते. दुपारी दोन वाजल्यापासून त्यांचे नातेवाईक शोध घेत होते.

रात्री साडेआठ वाजता त्यांचा मृतदेह येवले आखाडा येथे पाण्यातून बाहेर काढण्यात आला. काळे यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. गजानन काळे यांचे ते वडील होत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24