अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान रामचंद्र नेहे (६५) या वृद्धाचा मृतदेह रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द येथे गटारीत आढळला.
मृतदेह कुजल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. नेहे भिक्षा मागून मिळेल ते खात. त्यांना दारूचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पाटील किरण उत्तम गुंजाळ यांच्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.