अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारात विष्णू दिघे या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. दिघे यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
काल सकाळी धानोरे शिवारातील उसाच्या शेताजवळ दिघे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यात जखमा असल्याचे दिसून आले.
त्यामुळे त्यांचा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके,
पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.