अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :-साकत-जामखेड रोडवरील सावरगाव शिवारात भरधाव वेगातील टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

अपघातात अनुज आजिनाथ लांबरुड (रा. लांबरवाडी, ता.पाटोदा) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत १८ जून रोजी जामखेड पोलिस ठाण्यात अण्णासाहेब अर्जुन पठाडे (रा. चिंचपूर, ता.आष्टी, जि.बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आजिनाथ काशिनाथ लांबरुड यांनी फिर्याद दाखल केली. पठाडे यांनी त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयीने चालवून पाठीमागून मोटारसायकलला धडक दिल्याने ही घटना घडली. पुढील तपास पोहेकॉ. लाटे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24