अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, एक जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :-भेंडा-कुकाणा रस्त्यावर भेंडा बुद्रुक गावानजीक मळीनाल्या जवळ झालेल्या रस्ता अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील दोन तरुण गंभीर रित्या जखमी झाले असून

एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला उपचारसाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती आहे. आज दि.20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान भेंडा येथे मळीनाल्या नजीक रस्त्याने जात असलेल्या

मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील नितीन सोमनाथ पुंड व रमेश ज्ञानदेव पुंड (वय 28 वर्षे) हे दोघे सख्खे चुलत भाऊ गंभीररित्या जखमी झाले.

108 रुग्णवाहिका बोलावून त्यांना इतर प्रवाशांनी नेवासा फाट्यावरील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. जखमी पैकी नितीन नामदेव पुंड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24