अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून एकावर कोयत्याने केले वार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली आहे .मात्र या दरम्यान अनेक गावात वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

याच निवडणूकीच्या वादातून एकावर थेट कोयत्याने सपासप वार करून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. यात अफसर पापाभाई अत्तार (रा.आळकुटी ता.पारनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर असे की , पापाभाई अत्तार हे त्यांचा छोटा हत्ती (एम.एच १६ ऐई ९२६७) घेऊन बाभूळवाडा ठाकरवस्तीकडे जात होते.

यावेळी बुलेटवर आलेल्या दीपक रावसाहेब भदे (रा.रांधे ता.पारनेर) व एक अनोळखी इसम यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून अत्तार यांच्यावर भदे याने त्याच्या हातातील कोयत्याने एका पाठोपाठ सपासप वार केले.

यावेळी दुसरा अनोळखी इसमाने शॉकअब्स्सरच्या पाईपने गाडीच्या समोरील काचा फोडून अत्तार यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत अत्तार यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी दीपक रावसाहेब भदे (रा.रांधे ता.पारनेर ) व एक अनोळखी इसम या दोघावर गुन्हा दाखल केला असून, याबाबत अधिक तपास पोसई पदमने हे करत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक अजित पाटील,पारनेरचे पोलिस निरीक्षक बळप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24