अहमदनगर ब्रेकिंग : कांदा लिलाव शनिवारपासून बेमुदत बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला कवडीमाेल भाव मिळत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या आ ठवड्यात शेतकऱ्यांनी टाेमॅटाे रस्त्यावर तून आपला राग व्यक्त केला तर कांद्यालाही भाव नसल्याने कांदा उत्पादकही अडचणीत आले आहेत.

दरम्यान अहमदनगर मधील स्व. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार आवारामध्ये माल वाहतूकदार व खरेदीदार यांच्यामधील वाराई हमाली संदर्भात चर्चा करूनही वाद न मिटल्याने शनिवारपासून (दि. 4) पुढील निर्णय होईपर्यंत कांदा लिलाव बंद ठेवणार

असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी कळविले. तसेच शेतकऱ्यांनी आपला कांदा नेप्ती उपबाजार समिती येथे विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

माल वाहतूकदार आणि कांदा खरेदीदार यांच्यामधील वादात शेतकऱ्यांचा कांदा लिलाव होणार नाही. हा वाद कधी मिटणार आणि कांदा लिलाव कधी पूर्ववत सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24