अहमदनगर ब्रेकिंग : तहसील कार्यालयातील छताचा काही भाग कोसळला आणि….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- राहुरी येथील तहसिल कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरू होते. यावेळी अचानक छताचा काही भाग कोसळला.

या घटनेत नायब तहसीलदार पुनम दंडिले यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या बालबाल बचावल्या. या घटनेमुळे काही काळ तहसिल कार्यालयात चांगलीच धावपळ झाली.

राहुरी तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार पुनम दंडिले या दुपारच्या दरम्यान आपल्या कॅबिनमध्ये बसून कामकाज करत होत्या.

त्यावेळी अचानक पीयुपी चे छत असलेला काही भाग कोसळून नायब तहसीलदार पुनम दंडिले यांच्या खुर्चीच्या फूटभर अंतरावर पडला.

नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र मोठा आवाज आल्याने तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. त्यावेळी एक उद मांजर छताला असलेल्या पीयुपी च्या वरती पळत असताना अनेकांनी पाहीले.

नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी तत्काळ वन विभागाची संपर्क करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी येवून पाहणी केली. ते उद मांजर गेल्या दोन वर्षापासून तहसिल कार्यालयात वावरत आहे.

त्या उद मांजराला तहसीलच्या अनेक कर्मचाऱ्यांनी पाहिले आहे. त्या उद मांजरा विषयी अनेक वेळा वन विभागाला महसूलने कळविले असता याकडे वन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

पीयुपी चे कोसळलेले छत कोणाच्या अंगावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतू नशीब बलवत्तर म्हणून आलेले विघ्न टळले. अशी चर्चा यावेळी सुरू होती. यावेळी कृष्णा पोपळघट या सर्पमित्राला बोलावून पिंजरा लावण्यास सांगितले.

मात्र तहसिल कार्यालयातील कर्मचारी काम करण्यास घाबरत आहेत. या उद मांजराचा वन विभागाने लवकरच बंदोबस्त करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24