अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांनी पकडले ६१ लाख रुपयांचे चंदन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर-मनमाड मार्गावरून मध्यप्रदेशकडे ६१ लाख रुपये किंमतीचे ६५० किलो चंदन घेऊन जाणारा टेम्पो राहूरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने अडवून धडाकेबाज कारवाई करून केरळ राज्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.

आज शनिवारी दुपारी नगर-मनमाड मार्गावरून 16 बीसी-7999 या क्रमांकाच्या सम्राट कंपनीच्या टेम्पोमधून पाठीमागे बाजूस हौदाच्या खाली चंदन टाकून त्यावर लोखंडी प्लेट फिट करून हे मध्यप्रदेश येथे जात असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता मिटके यांच्या पथकाने य देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांना सदर टेम्पो अडविण्याची सूचना दिली.

त्यानुसार स्थानिक खासगी इसम दासू पठारे, श्रीकांत नालकर व इतर तीन ते चार जणांनी टेम्पो अडविण्याकामी गणेश फाटक यांना मदत केली. राहूरी फॅक्टरी येथे सदर टेम्पो अडविल्यानंतर सदर टेम्पो मोकळा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत होते.

परंतु पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथक घटनास्थळी आल्यानंतर टेम्पोचालक व साथीदार यांना पोलीस हिसका दाखवताच त्यांनी टेम्पोच्या हौद्यात खालच्या बाजूला चंदन लपून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांसमक्ष टेम्पोतील लोखंडी प्लेटाचे नट बोल्ट खालून व वरून खोलून लोखंडी प्लेट बाजूला करून सुमारे ६५० किलो चंदन या प्लेटाच्या खाली सापडले.

त्याची किंमत ६१ लाख रुपये तर १० लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याचे डीवायसएसपी संदीप मिटके यांनी सांगून ही आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय व्यक्त केला.

६१ लाख रुपयांचे चंदन पकडल्यानंतर पोलिसांनी टेम्पो चालक व साथीदार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अब्दुल फकरूद्दीन रहेमान, अब्दुल मोहम्मद निसाद हे नाव सांगून केरळ राज्यातील रहिवासी असल्याचे सांगितले.

सदर चंदन मध्यप्रदेश राज्यातील बुरन्हापूर येथे घेऊन चाललो असल्याचे त्यांनी सांगितले. राहूरी पोलीस ठाण्यात टेम्पोचालक व त्याचा सहकारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची करवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांच्या पथकातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवडे, सुनील दिघे,सुरेश औटी, जानकीराम खेमनर राजेंद्र आरोळे, तर राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, निलेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24