अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारीही अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह पाच आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यात संबंधित महिलेकडून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याच्या पहिल्या दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केले असता,
युवतीने क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल करून खंडणी मागणीचा गुन्हा उघडकीस आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.
या दाखल गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यातील आरोपीमध्ये पोलिस कर्मचा-याचा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या यात एका क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे.
त्या संबंधित अधिकाऱ्याने परिस्थिती लक्षात घेऊन ब्लॅकमेल करून खंडणी मागणा-या टोळीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्या क्लासवन अधिका-याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्या महिलेचा खास एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांचाही समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दरम्यान सदर महिला व तिच्या साथीदारांनी अशा पद्धतीने अनेकांना ब्लॅकमेल केल्याची चर्चा असून पोलिसांनी या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला आहे.
महिलेचा जाळ्यात अडकलेला सदर अधिकारी जखणगाव शेजारच्या गावातील रहिवासी आहे.या अधिकार्याकडे तीन कोटींची खंडणी त्या संबंधित युवतीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्याने कबूल केले होते.