अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक खळबळजनक अशी बातमी समोर आली आहे, पारनेर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी याची पत्नी पुष्पा माळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
शेत जमिनीचा बेकायदा ताबा घेऊन नंतर ताबा सोडण्यासाठी एकरी पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. याबाबत सविस्तर माहिती अशी कि पारनेर तालुक्यातील रोहिदास भास्कर देशमुख यांच्या मालकीची १९ एकर जमीन आहे.
२०१८ मध्ये तेथे डाळींबाचा बाग होता. १ नोव्हेंबर २०१८ रोजी तेथील स्थानिक रहिवासी दगडू दुर्योधन केदारी, त्याचा मुलगा तसंच जामगांव येथील बाळासाहेब पोपट माळी यांनी जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता.
या क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेली टपरी का टाकली अशी विचारणा केली असता बाळासाहेब माळी याने दगडू दुर्योधन केदारी यांच्याकडून मी जनरल मुख्यत्यारपत्र करून घेतले आहे. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाचा निकाल देशमुख यांच्याविरोधात गेला आहे.
त्यामुळे देशमुख यांना या क्षेत्रात वहिवाट करण्याचा किंवा शेती करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर २२ नोहेंबर रोजी देशमुख यांनी माळी तसेच केदारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी एकरी पाच लाख रूपयांप्रमाणे खंडणीची मागणी केली.
पैसे न दिल्यास परिणाम वाईट होतील, तुम्हाला शेतामध्ये येऊ देणार नाही. जर शेतामध्ये आले तर तुमचे हातपाय मोडून टाकू असा दमही दिला होता.या गुन्ह्यात अरोपींमध्ये पुष्पा माळी यांचाही समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुष्पा माळी पोलिसांच्या हाती लागत नव्हत्या. त्यामुळे त्यांना आतापर्यंत अटक झाली नव्हती.