अहमदनगर ब्रेकिंग : वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी! पत्रे उडाल्याने वृद्ध जखमी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोनाच्या संकटात शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला असतांनाच आता निसर्गाने देखील त्याच्यावर डोळे वटारले आहेत.

बाजार बंद करण्यात आले असल्याने आधीच शेतमालाचे नुकसान होत आहे त्यात परत अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याने शेतकऱ्यांचे उरलेल्या मालाचे तीनतेरा वाजवले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव आणि परिसरात काल झालेल्या वादळाने शेतीसह राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यात अनेक झाडे वादळीवाऱ्याने उन्मळून पडली आहेत. यावेळी घरावरील पत्रे अंगावर पडल्याने येथील आश्रू रामभाऊ भोईटे (वय ७५) हे वृद्ध जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालया  प्राथमिक उपचारानंतर अहमदनगर येथील रुग्णालयात  दाखल केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने अनेक घरांची पडझड झाली आहे.

माळी बाभूळगाव येथील भोईटे वस्तीवरील राहत्या घराचे पत्रे वाऱ्याने उडून गेले असून, घराची वरंडी पडली आहे.

यावेळी घरात असलेले आश्रू रामभाऊ भोईटे हे गंभीर जखमी झाले आहेत. पावसाने संसारउपयोगी सर्व वस्तूंचे नुकसान झाले असून, संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.

यासह आंबा, डाळिंब , टरबूज, खरबूज, पपई आदी फळबागांसह कांदा, भुईमूग व इतर चार पिकांचे देखील नुकसान झाले आहे. वादळाने रस्त्याच्या बाजूची झाडे पडल्याने रस्ते बंद झाले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24