अहमदनगर ब्रेकींग: खासगी बसची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नीसह मुले जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- खासगी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पतीचा मृत्यू झाला असून पत्नी व तिचे दोन मुले जखमी झाले आहेत. हा अपघात अहमदनगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास चौकाजवळ हॉटेल नीलसमोर झाला.(Ahmednagar Breaking)

अंबाराम नंदू डूडवा (वय 35 रा. बोल्हेगाव, अहमदनगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याची पत्नी पप्पी अंबाराम डूडवा (वय 33) व त्यांची दोन मुले हे जखमी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी जखमी पप्पी डूडवा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅव्हल्स (आरजे 51 पीए 494) वरील चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाराम हे त्यांच्या दुचाकीवर त्यांची पत्नी व दोन मुलांना घेऊन बोल्हेगाव येथून केडगाव बायपास रोडने वाळकी (ता. नगर) येथे जात होते. नील हॉटेलसमोर पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने येणार्‍या ट्रॅव्हल्स चालकाने अंबाराम यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत जखमी झालेल्या डूडवा पती-पत्नी व त्यांच्या दोन्ही मुलांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अंबाराम यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघात होताच बस चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब ईखे करीत आहे.