अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत आक्षेपार्ह फोटो काढून नंतर बदनामीची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. १९ मे ते १७ जूनदरम्यान नगर-सोलापूर रोडवरील लॉज व चांदबीबी महाल परिसरात ही घटना घडली. सोहेल अख्तर सय्यद (रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने पीडितेला पुन्हा बदनामीची धमकी देत तिच्याकडून पैशाची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीनं आपल्याजवळी आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आरोपीला दिले. तरीही आरोपीचा त्रास कमी झाला नाही.
त्यामुळे आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोहेल अख्तर सय्यद असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगरमधील मुकुंदनगर येथील रहिवासी आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. दरम्यानच्या काळात आरोपीनं पीडितेशी मैत्री करून तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढले. यानंतर हे फोटोज व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीनं पीडितेचं लैंगिक शोषण आणि त्रास सुरूच ठेवला.
यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, धमकी आणि अन्य कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.