अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे जबरदस्तीने बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-राहुरी तालुक्यातील एका गावात आपल्या आजी आजोबांच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना डिसेंबर २०२० दरम्यान घडली आहे.

पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यातून आलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

कोपरगाव तालूक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडीलांनी दिवाळीसाठी तिच्या आजी आजोबाकडे राहुरी येथे पाठवले होते.

तेव्हापासून ती मुलगी राहुरीत आजी आजोबां बरोबर राहत होती. २०२० साली डिसेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अल्पवयीन मुलगी ही घराच्या ओट्यावर रात्रीच्या वेळी एकटीच झोपली असताना आरोपी बाळासाहेब रोकडे याने तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला.

तसेच कोणाला काही सांगितले तर तूला मारहाण करीन. अशी धमकी दिली. वारंवार बलात्कार केला. गेल्या आठवड्यात पिडीत मुलगी तिच्या आई वडीलांच्या घरी कोपरगाव येथे गेली.

दरम्यान तिला त्रास होऊ लागल्याने ती गरोदर राहिल्याचे समजले. तिच्या आई वडीलांनी ताबडतोब कोपरगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवीली. ती फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात प्राप्त झाली.

त्यानूसार आरोपी बाळासाहेब भानुदास रोकडे राहणार सोनगांव सात्रळ, ता. राहुरी याच्या विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राहुरी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून गजाआड केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ करित आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24